Showing posts with label Marathi. Show all posts
Showing posts with label Marathi. Show all posts

Tuesday, 19 August 2014

Posted by Samirsinh Dattopadhye On August 19, 2014
Sai-Mahima-Saicharitra-maza-sadguru-sainath
Sai Mahima
साईनाथ माझा देव l साईनाथ माझा माव l
 साईनाथ माझा साव l साईनाथ सद्‌गुरू ll१ll

अनन्य भक्ति तुझी देवा l द्यावा तुम्हीच रावा l 
न थे मज पूजा सेवा l अधं बधीर मी ll२ll

मन माझे शांत व्हावे l तुझे नाम सदा यावे l 
तुझे चरण सेवावे l सर्वकाळ ll३ll

आंधळ्याने सर्व देखावे l मुक्याने वेद वदावे l 
पांगळ्याने गड चढावे l तुझीया कॄपे ll४ll

तू कृपेचा सागर थोर l मी अतिमंद मूढ ढोर l 
भक्तिकार्या मी कामचोर l उध्दरी रे ll५ll

सकंटी तू आठव देसी l सूखाते भूल पाडीसी l 
ऎसी खेळी का खेळसी l गुरूराया ll६ll

साईनाथा साईरामा l अरे नित्या पूर्ण कामा l 
साईबाबा साईदेवा l तारी मज ll७ll

तू माझी माऊली l आणि मी रसातळी l
 ऎसी गोठ जाहली l कैसी देवा ll८ll

जया मनी जैसा भाव l तया तैसा अनुभव l 
हीच असे तुझी नाव l संसार तरण्या ll९ll

ह्या संसारी ओझी फार l थकलो मी वाहूनी भार l 
म्हणूनी आरंभिले तुझे गान l स्वस्थ होण्या ll१०ll

 अंधार दाटो चोहीकडे l किंवा पूर पर्वता एवढे l 
तुझीया कृपेचे रोकडे l जाब मिळती ll११ll

आधि व्याधी चिंता रोग l क्लेश ताप दु:ख भोग l 
करिता तुझा नामयोग l नष्ट होती ll१२ll

 कलियुगाची नीती येर l पूजे ऎवाजी नाना थेर l 
साईनामची दावी अखेर l सत्यलीला ll१३ll

भक्तांसाठी कधीही कुठेही l धावत येई साह्य होई l 
ह्या विश्‍वास धरितो पाही l साईराम ll१४ll

साईबाबा हाची साईराम l साईकृष्णची साईकाम l 
सर्व जगांत हे पूर्ण नाम l साईनाथ साईनाथ ll१५ll

मजला आवडो अथवा नावडो l तु जे इच्छिसी तेची घडो l
 हेची मागता व अवघडो l जीभ माझी ll१६ll

धर्म अर्थ काम मोक्ष l तू असशी सर्व साक्ष l 
चारी पुरूषार्थ माझे रक्ष l जन्मांतरी ll१७ll

करावे तैसे भरावे l वाईटाने दु:खची व्हावे l
कर्म एसे टळावे l तुझिया नामे ll१८ll 

आता दे मज्‌ सद्‌बुध्दि l काया वाचा मन:शुध्दि l
 तुझिया दारी अष्टसिध्दि l मज काय उणे ll१९ll

''सद्‌गुरू श्री साईनाथ महाराज की जय''